महाराष्ट्र शासनाने 1 एप्रिल 2023 पासून जन्मलेल्या मुलींसाठी व मुलीच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरुवात केली आहे.या योजनमुळे गरीब कुटुंबातील मुलींना या योजनेचा मोठयाप्रमाणात फायदा होणार आहे.या योजनेचा लाभ शासनाच्या पोस्ट ऑफीस च्या माध्यामातुन होणार आहे.
सदर योजनेच्या माध्यमातून राज्यात मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देउुन मुलींचा जन्मदर वाढवणे,मुलींच्या शिक्षणात चालना देणे,मुलींचे बालविवाह रोखणे,कुपोषण कमी करणे तसचे शाळाबाहय मुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी सदरची लेकी लाडकी योजना राज्यात सुरु करण्यात आली आहे. सदर योजनेसाठी मातांनी आपल्या लेकीसह पोस्टात जाऊन सदरचे संयुक्त काढून घेऊन लेक लाडकी योजनेचा फायदा घेयचा आहे.

  • लेक लाडकी योजनेचा फायदा कोणाला होणार?
  • 1 एप्रिल 2023 नंतर जन्मणा-या 1 अथवा 2 मुलींना
  • 1 मुलगा व 1 मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा फायदा.
  • दुस-या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास 1 मुलगा किंवा दोन्ही मुलींना

टिप-पहिल्या अपत्याच्या तिस-या हफत्यासाठी व दुस-याअपत्याच्या दुस-या अपल्याच्या दुस-या हफत्यासाठी अर्ज सादर करताना माता व पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे,

  • योजनेच्या लाभाचे वाटप कसे होणार?
  • पिवळया व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात जन्माला आल्यानंतर मुलीला जन्म झाल्यावर रुपये 5 हजार रुपये
  • इयत्ता पहिलीत गेल्या 6 हजार रुपये
  • इयत्ता सहावीत गेल्यावर 7 हजार रुपये
  • इयत्ता 11 वीत गेल्यावर रुपये 8 हजार रुपये
  • 18वर्ष पुर्ण झााल्यावर रुपये 75 हजार रुपये

अशा पध्दतीने रुपये 1 लाख 1 हजार रुपायाचा लाभ होणार आहे.
सदरची रककम ही थेट लाभार्थी हस्तांतरण (DBT)व्दारे लाभार्थ्याच्या खात्यात वितरीत केली जाणार आहे.
खाते कोठे काढावे. या योजनेसाठी लाभ्यार्थी बालिका व तिची आई या देाघींचे खाते पोस्ट ऑफीसमध्ये जाऊन काढवे.

अर्ज कोठे करावा.
तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविका ताईकडे तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करावयाचा आहे. या अर्जात वैयक्तिक माहीती,मोबाईनंबर,अपत्यांची माहिती तसेच पोस्ट ऑफीस बचत खाते पुस्तक तपशील इ माहिती अंगणवाडी सेविकेस दयावची आहे.


*आवश्यक कागदपत्रे*
1.लाभार्थी जन्माचा दाखला
2.कुटुंब प्रमुखाचा उत्पनाचा दाखला(वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा नसावे)
3.लाभार्थ्याचे आधारकार्डत्र(प्रथम लाभावेळी ही अट शिथिल करण्यात आली आहे)
4.पालकाचे आधारकार्ड
5.पोस्ट ऑफीस बचत खाते पासबुक झेरॉक्स
6.रेशनकार्ड (पिवळे अथवा केशरी)
7.मतदान ओळखपत्र
8.कुंटुब नियोजन प्रमाणपत्र

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now