Site icon janmahitinews

Pm Kisan Yojana 16th installemnt- पी एम किसान सन्मान योजना 16 वा हफता

pm kisan

केद्रशानाचा प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 16 वा हफता आज दि 28/02/2024 रोजी महाराष्ट्रीतील यवतमाळ जिल्हातून
वितरीत होणार आहे. सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास देशातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही हफत्याची रककम
जमा करण्यात येणार आहे असे आवाहन केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांनी केले आहे.पी एम किसान योजनेचा हा आतार्यंतचा हा 16 वा हफता आहे.

पी एम किसान योजनेअंर्गत शेतकरी बांधवांना वार्षिक 6 हजार दिले जातात. सदरची रक्कम ही प्रत्येकी 4 महिन्याला
शेतक-यांना दिली जाते. प्रत्येकी 2 हजार प्रमाणे वर्षातुन 4 महिन्याप्रमाणे वार्षिक 6 हजार रुपये शेतक-याला दिले जातात.

सदरची रक्कम ही आधार सिडींग सिस्टीम प्रमाणे जमा होणार आहे म्हणजेच शेतक-यांच्या बँक खात्याला आधार लिंक असणे गरजेचे आहे. बँक खात्याला आधार लिंक आहे की नाही हे पाहण्यासाठी प्रथम शेतक-याच्या आधारकार्डला मोबाईल लिंक असणे गरजेचे आहे.सर्व प्रथम आधारकार्डला मोबाईल लिंक आहे का नाही ते पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.

https://myaadhaar.uidai.gov.in/genricDownloadAadhaar

जर तूमच्या आधारकार्डला मोबाईल लिंक नसेल तर तुम्ही जवळच्या आधारसेंटर ला जावा व आपले आधारकार्ड लिंक करा
तसेच काही कलावधीमध्ये आपले आधारकार्ड लिंक होईल. त्यानंतर सदरचे आधारकार्ड डिबीटी लिंक म्हणजेच बँकेचे खाते आधारकार्डला लिंक आहे का ते पाहा. माहीत नसल्यास खालील लिंक वरती जाऊन क्लिक करा व खालील प्रोसेस फॉलो करा.
सर्वप्रथम लिंक वरती क्लिक करा.अशाप्रकारे इंटर फेस दिसेल

https://tathya.uidai.gov.in/access/login?role=resident

आधार नंबर इंटर करा व कॅपच्याय भरा लॉगिन विथ ओटीपी वरती क्लिक करा.

आधारकार्डला लिंक केलेल्या मोबाईलवरती ओटीपी प्राप्त होईल तो भरा व लॉगिन करा. त्यानंतर Bank Seeding Status
असा का पर्याय दिसेल तेथे क्लिक करा. मग लगेच तुम्हाला तुम्हाच्या आधाकर्डला लिंक असणारी बॅक दिसेल व त्याचे
स्टेटसही दिसेल. जर तुमची बँक लिंक नसेल तर बॅकेत जाउन आधार सिंडींगचा फॉर्म भरा.पीएम सन्मान योजने खात्याचे स्टेटस चेक करण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.

https://pmkisan.gov.in/BeneficiaryStatus_New.aspx

केवाएसी केली नसेल तर ओटीपी किंवा बायोमॅट्रीक पध्दतीने केवाएसी करुन घ्या. आधारकार्डला मोबाईल लिंक असेल तर
तुम्ही घरबसल्या केवाएसी करु शकता नसे तर तुम्हाला बायोमॅट्रीक केवाएसी साठी आपल्या जवळच्या सीएसी सेंटरवरती जावे
लागेल. जर तुमचे स्टेटस Land Seeding असे दाखवत असेल तर सात बारा घेऊन आपल्या कृषी अधिकारी यांच्याशी
संपर्क साधावा जर आपण शासन नियमाने पात्र असाल तर कृषीधिकारी आपणास सदरचा फॉर्म भरुन आपली माहिती शासनास
पाठवतील व आपले हफते पुन्हा सुरु केले जातील,
धन्यवाद.

Exit mobile version