महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांचे आर्थीक,सामाजिक पुनवर्सन करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना दिनांक 1 जुलै पासुन राज्यात लागू केली आहे.वय वर्ष 21 ते 65 वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला रुपये 1500 रुपये देण्यात येणार आहेत. तरी या योजनेबाबत सविस्तर माहिती घेऊयात.
महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री मा.अजित पवार(Ajit Pawar)यांनी विधासभेत अर्थसंकल्प सादर केला त्यावेळी अर्थसंकल्पात महिलांसाठी एका खास योजनेची घोषणा केली. “मुख्यंमत्री माझी लाडकी बहीण योजना”(Chif Minister Ladki Bhahin Yojana)यांनी या योजनेचा फायदा घेण्यासाठी तलाठी ऑफीसमध्ये व इतर सरकारी कार्यालयाता मोठया प्रमाणात रांगाच रांगा लागल्या त्यांनतर त्यांनतर शासनाने 31 ऑगष्ट 2024 रोजीची मुदतवाढ करत उत्पन्न दाखला व अधिवास प्रमाणपत्र रदद केले तरी आवश्यक कागदपत्रे,ई माहिती आपण पाहूयात.
ऑनलाईन पोर्टल आहे का?
सदर योजनेसाठी कोणतेही ऑनलाईन पोर्टल नसुन नारीशकती डोट या नावाचे ॲपलिकेशन आहे ते खालील लिंक वर डाऊनलोड करावे.
https://play.google.com/store/apps/details?id=com.saaviinfinet.narishakti_yojana_doot
वयाची अट- सदर योजनेसाठी 21 ते 65 दरम्यानच्या महिला पात्र आहेत.
आवश्यक कागदपत्रे- 1)आधारकार्ड-
2)अधिवास प्रमाणापत्र(डोमासाईल)/जन्म प्रमाणपत्र /शाळा सोडलेला दाखला
3)उत्पन्न प्रमाणपत्र/ केशरी किंवा पिवळे रेशनकार्ड(पांढरे रेशनकार्ड असल्यास उत्पन्न दाखला आवश्यक आहे)
4)हमीपत्र-(सदर हमीपत्र मिळवण्यासाठी खालील हमीपत्र डाऊनलोड करा येथे क्लिक करा)हमीपत्रावरील बाबी नीट वाचा
त्यांच्या सही करुन ॲप मध्ये हमीपत्र हया ठिकाणी अपलोड करा.
5)बँक पासबुक- बँक पासबु स्पष्ट दिसेल असे अपलोड करा.
तसेच या योजनेतुन 5 एकर शेतीची अट ही वगळयात आल्यामुळे राज्यातील 5 एकर पेक्षा जमिन असणा-या लाभार्थ्याना या योजनेचा फायदा होणार आहे.
कोण असेल पात्र-
महाराष्ट्रचा रहिवासी
विवाहीत,विधवा,घटस्फोटित,परित्यक्त्या व निराधार महिल
कोण असेल अपात्र
2.50(अडीच लाखापेक्षा अधिक उत्पन्न् असणारे कुंटुंब)
सरकारी नोकरदार
कुंटुंबातील सदस्याकडे 4 चाकी वाहन असल्यास(ट्रक्टर सोडून)
अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या अंगणवाडी ताईची/मोबाईल ॲप/सेतु सुविधा केंद्र यांशी संपर्क करावा.तसेच सविस्तर माहिती वाचण्यासाठी महाराष्ट्र शासन यांच्याकडील सुधारित जीआर येथे उपलब्ध आहे
https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202406281814018230.pdf