सुकन्या समृध्दी योजना 2021

सुकन्या समृध्दी योजना 2021 ही केंद्र शासनाची मुलींसाठीची महत्त्वकांक्षी योजना आहे. देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी बेटी बचाओ,बेटी पढाओ या महत्त्वकांक्षी अभियानाअंतर्गत ही योजना देशात दि २२ जानेवारी २०२१ रोजी सुरु केली. सदरची योजना ही मुलींच्या लग्नाच्यावेळी किंवा उच्च शिक्षण घेताना फायदेशीर फायदेशीर ठरु शकते.

सदर योजनेमध्ये मुलीच्या आईवडील किंवा पालनकर्तै यांच्याकडून कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेमध्ये किंवा पोस्ट ऑफीसमध्ये बचत खाते उघडून योजनेचा लाभ दिला जातो.

योजनेचे स्वरुप– सुकन्या समृध्दी बचत खात्यामध्ये दरवर्षी किमान रु 250/- किंवा जास्तीत जास्त 1.50(दिडलाख)रुपये रक्कम भरुन सदरची गुंतवणूक सुरु करता येते. खाते उघडल्यापासून ते मुलगी 21 वर्षाची पुर्ण झाल्यावर म्हणजे मुलीच्या लग्नाच्या वेळी या योजनेची मॅच्युरीटी होते व चांगल्या व्याजदराने परतावा परत मिळतो.

योजनेची ठळक वैशिष्टे
1.बचत ठेवीचा कालवाधी हा मुलीचे सुकन्या खाते सुरु केल्यापासून ते मुलगी 21 वर्ष होईपर्यत गणला जातो.

2.सुकन्या योजनेचा कालवधी हा वय वर्षे 21 पर्यंत जरी असला तरी 14 वर्षापर्यंतच पैसे सदरच्या खात्यात भरावयचे असतात.

3.मुलीने 18 वर्षे पुर्ण केल्यानंतर मुलीच्या उच शिक्षणासाठी मागील आर्थीक वर्षाच्या शिल्लकीवर 50 रक्कम अकाली काढता येते .

4. मुलीचे वय 21 वर्षे पुर्ण होण्यापुर्वी लग्न केल्यास सदरचे सुकन्या समृध्दी खाते बंद होते.

5.आयकर कायदा 1961, कलम 80 सी या कायदयाअंर्गत कर भरण्यात पूर्ण मदत मिळवता येते.

6.दरवर्षी सुकन्या समृध्दी खात्यात 250/- रुपये जमा नाही केले तर सदरचे खाते बंद होते. परंतु पुन्हा सुरु ठेवण्यासाठी दरवर्षीप्रमाणे 50 रुपेय दंड भरुन सदचे खाते पुन्हा सुरु करता येते.

7.मुलगी 21 वर्षाची झाली म्हणजेच पॉलिसी मॅच्युरिटीनंतर सदरचे खाते बंद नाही केले तरी सदरच्या रक्कमेवर चालु व्याजदरात व्याज हे दिले जाते.

8.खातेदाराचा अकाली मृत्यू झाल्यास पालकांना व्याजासहित रककम मिळते.

सुकन्या समृध्दी योजनचे निकष/पात्रता

1.वय वर्षे 10 खाली मुलींना या योजनेचा लाभ घेता येतो.

2.दोन मुली असतील तर दोंघीसाठी सदरचे सुकन्या समृध्दी बचत खाते सुरु करता येते.

3.प्रसुतीवेळी जुळया किवा तिळया मुली झाल्यानंतर त्यांच्या नावेही सदरचे बचत खाते सुरु करता येउ शकते.

4.सुकन्या समृध्दी बचत खात्यामध्ये डिमांड ड्राफटने किंवा चेक तसेच कोअर बँकिंग प्रणालीदवारे ही रक्कम ट्रान्सफर करता येऊ शकते.

     पशुसंवर्धन विभागाच्या वतीने दुधाळ म्हशी/गाई तसेच शेळी/मेंढी वाटप योजना
 
 



सुकन्या समृध्दी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे-
  1. मुलीचा जन्माचा दाखला
  2. योजना फॉर्म
  3. पॅनकार्ड
  4. आधारकार्ड
  5. रेशनकार्ड किंवा वीजबील
  6. मतदान ओळखपत्र
वरील सर्व कागदपत्रे ही मुलीच्या पालकांची किंवा पालनर्त्यांची असावीत. योजनेचा बँकेचा किंवा पोस्टचा  दोन्ही फॉर्म तुम्हास खालील डाऊनलोंड या ठिकाणी मिळून जातील
 
सुकन्या समृध्दी योजनासाठी राष्ट्रीयकृत बँकांची यादी
  • स्टेट बँक ऑफ इंडिया
  • विजया बॅक
  • युनियन बॅक
  • बँक ऑफ इंडिया
  • बँक ऑफ महाराष्ट्र
  • स्टेट बँक ऑफ पटियाला
  • युनियन बॅक
  • युको बँक 
  • इंडियन बँक
  • इंडियन ओवरसीज बॅक
  • पंजाब नॅशनल बँक
  • सिंडिकेट बँक
  • आईडीबीआई बँक
  • आसीआसीआय बॅंक
  • कॉपौरेशन बँक
  • कॅनेरा  बँक
  • बँक ऑफ बदोडा
  • सेट्रंल बॅक ऑफ इंडिया
  • ॲक्सिस बँक
  • आध्रा बँक

यापेक्षा अधिक बँकमध्ये ही सदरची योजनेची बचत खाते सुरु करता येते तरी बँकेची संपर्क करावा किंवा आपल्या जवळच्या पोस्टमन दादाशी संपर्क करावा.

सुकन्या समृध्दी योजनेचा फॉम डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 



सुकन्या समृध्दी पोस्ट ऑफीस फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *